या आडवड्यात कॉमेडी सिनेमांचा हास्य कल्लोळ

December 9, 2010 5:40 PM0 commentsViews: 3

09 डिसेंबर

या आठवड्यात कॉमेडी सिनेमांची बरीच रेलचेल आहे बर्‍याच दिवसांनी भरत जाधव आणि संजय नार्वेकर यांची एकत्र धमाल पाहायला मिळणार ती 'आटापिटा' या सिनेमात. यात भरत जाधव लेखकाच्या भूमिकेत आहे. मराठीप्रमाणेच एक बॉलीवूडचाही धमाल सिनेमा पाहता येईल तो म्हणजे नो प्रॉब्लेम. अनिल कपूर, अक्षय खन्ना, संजय दत्त, परेश रावल, कंगना राणावत आणि सुश्मिता सेन अशी बरीच स्टारकास्ट या सिनेमात आहेत. बॉलीवूडचा आणखी एक विनोदी सिनेमा पाहता येईल तो म्हणजे 'बँड बाजा बाराती'. हे तिन्हीही कॉमेडी सिनेमे आहेत आणि ते या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे.

close