भारताचा दणदणीत विजय

December 10, 2010 1:32 PM0 commentsViews: 6

10 डिसेंबर

चेन्नईत एम.ए. चिदम्बरम स्टेडियमवर खेळला गेलेला भारत- न्यूझीलंड एकदिवसीय सिरीजच्या पाचव्या सामन्यात 8 विकेटने विजय मिळवत न्यूझीलंड टीमला 5-0 ने पराभव केला आहे. न्यूझीलंडने विजयासाठी भारतासमोर 104 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. सुरुवातीला भारताची सुरुवात खराब झाली. कॅप्टन गौतम गंभीर आणि विराट कोहली झटपट आऊट झाले. पण त्यानंतर युवराज आणि पार्थिव पटेलने चांगली पार्टनपशिप करत भारताला विजय मिळवून दिला पार्थिव पटेलनं करियरमधली आपली पाचवी हाफ सेंच्युरी ठोकली. त्याअगोदर भारतीय बॉलर्सनी आपला दणका या मॅचमध्ये सुद्धा कायम दाखवला आणि न्यूझीलंडला फक्त 27 ओव्हर्समध्येच ऑल आऊट केलं. आपल्या पहिल्याचं ओव्हरमध्ये प्रविण कुमारला गपटीलला आऊट करत न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. या धक्क्यातून न्यूझीलंडचे बॅट्समन नंतर सावरलेच नाहीत. आर. आश्विन ने सर्वाधिक 3 तर युवराज सिंग, युसुफ पठाण आणि आशिष नेहराने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर प्रविण कुमारला फक्त एक विकेट घेता आली.

close