सचिननं 20 कोटी रुपयांची जाहिरात नाकारली

December 10, 2010 1:45 PM0 commentsViews: 2

10 डिसेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेटमधला देव का म्हटलं जातं हे आज पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मैदानावर जितका तो लोकप्रिय आहे तितकाच जाहिरात क्षेत्रातही लोकप्रिय आहे. सचिनची लोकप्रियता कॅश करण्यासाठी जाहिरात क्षेत्रात चढाओढ सुरु असते. पण मैदानावर प्रत्येक बॉल ओळखून खेळणारा सचिन मैदानाबाहेरही तितकाच चोखंदळ आहे. आणि म्हणूनच त्यानं मद्य निर्मिती कंपनीची तब्बल 20 कोटी रुपयांची जाहीरात धुडकावून लावली.

सचिनने आजपर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केले. पण जाहिरात क्षेत्र गाजवत असतानाच सचिनने आपली सामाजिक आणि भावनिक बाजूही यातून सांभाळली. सचिनने याआधी ही सिगरेट आणि दारूच्या जाहिरातीमध्ये काम करणार नसल्याचे स्पष्ट केले होते.आणि या शब्दाला सचिन आज जागला.

close