नीरा राडिया प्रकरणी शिवसेनेचा पलटवार

December 10, 2010 1:55 PM0 commentsViews: 1

10 डिसेंबर

नीरा राडिया टेप प्रकरणावरुन उद्वव ठाकरेंवर झालेल्या आरोपांचे पडसाद आजही विधानसभेत उमटवले शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांनी स्थगन प्रस्तावा अर्तंगत चर्चा केली. बाबा सिद्दकी हेतुपुरस्सर फक्त उद्धव ठाकरे यांच्यावरच बोलले. पण आपल्या पक्षाच्या लोकांवर ते बोलेले नाहीत. असा आरोप सुभाष देसाईंनी केला. त्या टेपमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग, सोनिया गांधी, शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांचाही उल्लेख असल्याचे देसाईंनी सांगितले. तर सिद्दिकी ही नावं लपवत असल्याचा आरोप सुभाष देसाईंनी केला. काल नीरा राडिया टेपमध्ये उद्धव ठाकरेंचही नाव असल्याचा आरोप बाबा सिद्दीकींनी केला होता. त्यामुळे शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला.

close