ज्वेलर्सवर दरोडेखोरांना 24 तासात अटक

December 10, 2010 1:57 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबर

काल गुरुवारी महालक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा घातलेल्या 10 जणांना आज ठाणे जिल्ह्यातून पकडण्यात आलं. आणि विशेष म्हणजे गावकरी आणि पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडलं. विक्रमगड इथे काल रात्री महालक्ष्मी जेल्वर्स दरोडा टाकण्यात आला होता. या घटनेमागे झाबुआ गँग असल्याची माहिती मिळाली. एकूण तीस लोकांची गँग सक्रिय असून त्यांनी कालच्या घटनेत 20 लाख रुपयांचे सोनं लुटले होते. दरम्यान दरोडेखोरांना पकडणार्‍या पोलिस आणि गावकर्‍यांना गृहमंत्री आर आर पाटील यांनी 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले आहे.

close