भाजपचे आमदार पोतदाराच्या वेषात

December 10, 2010 2:19 PM0 commentsViews: 4

10 डिसेंबर

नागपूर अधिवेशनात आजचा दिवस हा आंदोलनाचा दिवस ठरला आहे. अनेक मागण्यासाठी विविध पक्षानी आंदोलनानी विधानसभेचा परिसर दणाणून सोडला. मातंग समाजाच्या विकासासाठी लातूरचे भाजपचे आमदार चक्क पोतराजाच्या वेशात नागपुरात विधानभवनाबाहेर उपोषणाला बसले. राज्य सरकारचे लक्ष मातंग समाजाकडे वेधण्यासाठी तसेच आपल्या काही मागण्या सरकारपुढे मांडण्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत. मातंग समाजाच्या विकासासाठी वेगळं आरक्षण मिळावं, मुंबई विद्यापीठाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं नाव द्यावं या त्यांच्या मागण्या आहेत.

close