आसाम स्फोटांची जबाबदारी ‘ उल्फा ‘ ने स्वीकारली

November 1, 2008 8:51 AM0 commentsViews: 4

1 नोव्हेंबर, आसामउल्फाचाच भाग असलेल्या ' आयएसएम आयएफ ' या गटानं आसाममधे सीरियल स्फोट घडवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. लोकल न्यूज चॅनेलला आलेल्या एसएमएसमध्ये या गटाने स्फोटांची जबाबदारी स्वीकारल्याचं म्हंटलं आहे. मात्र ज्या नंबरवरून हा मेसेज आलाय, तो नंबर इंडियन मुजाहिदीनचे दहशतवादी वापरत असल्याचा पोलिसांना संशय आहे. या हल्ल्यामागील सूत्रधारांचा छडा लावण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करणार असल्याचं मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंतप्रधान मनमोहनसिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी शनिवरी या भागाला भेट देणार आहेत. या भेटीत पंतप्रधान मनमोहनसिंग आसामचे राज्यपाल, मुख्यमंत्री तरूण गोगोई आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते हॉस्पिटलमध्ये जाऊन स्फोटातील जखमींची भेट घेतील.

close