विलासराव देशमुखांना हायकोर्टाची नोटीस

December 10, 2010 2:45 PM0 commentsViews: 2

10 डिसेंबर

लातूरमधल्या जमीन प्रकरणी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री विलासराव देशमुख अडचणीत आले आहेत. या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं विलासराव देशमुख आणि त्यांचा मुलगा आमदार अमित देशमुख आणि जिवन विकास प्राधिकरणाला नोटीस बजावली. एका जनहित याचिकेवर सुनावणी करतांना न्यायालयाने ही नोटीस बजावली.

कोर्टाने राज्य सरकालाही या प्रकरणात 7 जानेवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करायला सांगीतले. 18 वर्षांपुर्वी विलासराव देशमुख यांच्या ट्रस्टला एक जमीन दिल्या गेली होती. 18 वषांर्पुर्वी 5310 चौरस फूट जमीन विलासराव देशमुख यांच्या ट्रस्टला देण्यात आली होती. मूक बधिरांच्या शाळेसाठी ही जमीन देण्यात आली होती. पण अटी बदलवून या जागेवर शॉपींग कॉम्प्लेक्स उभारण्यात आले. याठिकाणी अमित देशमुख अध्यक्ष असलेली विकास को – ऑपरेटीव्ह बॅकेचे ऑफिससुद्धा कार्यरत आहे. विशाल यादव या याचिकाकर्त्याचे नाव असून त्यांच्यावतीने महेश जेठमलानी यांनी कोर्टात युक्तीवाद केला.

close