पुण्यात किल्ले शिवनेरीच्या विकास निधीत दहा लाखांचा घोटाळा

December 10, 2010 3:36 PM0 commentsViews: 3

10 डिसेंबर

राज्यात दररोज नवनवीन घोटाळे उघड होत असताना आता नव्याने अजून एक घोटाळा उघड झाला. पुणे जिल्ह्यातल्या किल्ले शिवनेरीच्या विकास निधीत तब्बल दहा लाखांचा घोटाळा झाला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महारजांच्या जन्मस्थान विकासासाठी दरवर्षी लाखो रुपये मंजृर केले जातात. कागदोपत्री खर्च दाखवून अधिकार्‍यांपासून राजकारण्यांपर्यंत पध्दतशीरपणे घोटळा केला जातो याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाले.

close