बालगंधर्व यांच्या जिवनावर चित्रपट

December 10, 2010 3:42 PM0 commentsViews: 1

10 डिसेंबर

राजा शिवछत्रपती या मालीकेव्दारे घराघरात पोहचलेले कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई आता एका नव्या चित्रपटाची निर्मीती करत आहेत.एकोणीसाव्या शतकात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावीत केलेले महान कलाकार बालगंधर्व यांच्या जिवनावर हा चित्रपट आहे.

ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरात सुरु आहे. ह्या चित्रपटासाठी मदत केलेल्या व्यक्तीचा आज केशवराव भोसले नाट्यगृहात चित्रपट चित्रीकरणाच्या निमित्ताने उभारण्यात आलेल्या सभेच्या सेटवर सत्कार करण्यात आला. जेष्ठ इतीहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार, गितकार जगदीश खेबुडकर, कलादिग्दर्शक जे.बी.सुतार,बालगंधर्व आणि संगीतसुर्य केशवराव भोसले यांच्या वंशजांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

close