कोकणात पर्यावरण आणि लोकभावनांकडे दुर्लक्ष – डॉ. माधव गाडगीळ

December 11, 2010 3:36 PM0 commentsViews: 11

11 डिसेंबर

जैतापूर प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा विरोध होत असतानाच आता कोकणातल्या विकास प्रकल्पांबाबत पर्यावरण तज्ज्ञांनी काही शंका उपस्थित केल्या आहेत. कोकणात कोणताही प्रकल्प राबवतांना पर्यावरण आणि लोकभावनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत पश्चिम घाट जीव- सृष्टी तज्ज्ञांच्या समितीने नोंदवले आहे.

प्रकल्पांबाबत स्थानिक नागरिकांचा आवाज पद्धतशीरपणे दाबला जात आहे, असंही या समितीच्या अहवालात नमुद करण्यात आलं आहे. केंद्रीय वनं आणि पर्यावरण मंत्रालयाने पश्चिम घाटातील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यांचा 4 ते 11 ऑक्टोबर दरम्यान दौरा केला. त्यानंतर ही निरीक्षण नोंदवण्यात आली आहेत.

close