मालेगाव बॉम्बस्फोटांमधील आरोपींना शिवसेनाप्रमुखांचे समर्थन

November 1, 2008 8:59 AM0 commentsViews: 3

1 नोव्हेंबर, मुंबई' या देशातल्या बेगडी निधर्मीवाद्यांना जर ' अफजल गुरू ' प्यारा असेल तरी आम्ही साध्वी प्रज्ञा, रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांच्यावर प्रेम का करू नये ? ' , असा सवाल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विचारला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामन्याच्या अग्रलेखात त्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत. साध्वी प्रज्ञा, रमेश उपाध्याय आणि समीर कुलकर्णी यांच्यामागे खंबीरपणे उभं राहावं, तसंच त्यांच्याकडे हिंदू समाजाचा गौरव म्हणून पाहावं असं, आवाहनही त्यांनी केलं आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांच्या लोकांना अडकवण्याचा कट आखला गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

close