सायनानं सुपर सीरिज जिंकली

December 12, 2010 11:49 AM0 commentsViews: 4

12 डिसेंबर

भारताची बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने 2010 वर्षाचा शेवट, विजयाने केला आहे. हाँगकांग सुपर सीरिजमध्ये बाजी मारत तिने आपली चौथी सुपर सीरिज स्पर्धा जिंकली आहेत. आज फायनलमध्ये तिने चीनच्या शियान वँगचा 15-21, 21-16 आणि 21-17 असा पराभव केला. हे वर्षं सायनासाठी स्वप्नवत गेलं. सिंगापूर आणि इंडोनेशिया अशा दोन सुपर सीरिज तिने सलग जिंकल्या. तसेच इंडियन ओपन आणि कॉमनवेल्थ स्पर्धेतही तिने बाजी मारली. यावर्षी तिचं हे तिसरं सुपर सीरिज विजेतेपद ठरलं आहे. या विजयामुळे सायना जागतिक क्रमवारीतही नंबर वन होण्याच्या जवळ पोहोचली.

सायनाच्या या यशचं सायनाचे कोच पुलेला गोपीचंद यांनीही कौतुक केलं. तिने जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हा विजय मिळवला अशी प्रतिक्रिया गोपीचंदनी दिली.

close