रजनीकांतचं 60 व्या वर्षात पदार्पण

December 12, 2010 12:17 PM0 commentsViews: 5

12 डिसेंबर

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतनं आज 60 व्या वर्षात पदार्पण केलं. रजनीकांतच्या वाढदिवसामुळे चेन्नई शहर रजनीमय झालं. लाडक्या रजनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या फॅन्सनी रस्त्यांवर मोठी गर्दी केली होती. फॅन्सनी काल रात्रीपासूनच जल्लोष सुरु केला होता. यावेळी रजनीकांतच्या कटआऊट आणि पोस्टर्सची आरती फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रजनीकांतने मात्र आपला वाढदिवस कुटुंबियांसमवेत साधेपणाने साजरा करणार असल्याचं जाहीर केलं.

close