आंबेगावात दरोडेखोरांची 2 हजारासाठी दोघांची हत्या

December 12, 2010 1:05 PM0 commentsViews: 3

12 डिसेंबर

आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी इथं मध्यरात्री अडीचच्या सुमारास दरोडा घालून दोन जणांची हत्या केली. पोपट वनवे आणि दशरथ वनवे या बाप लेकाची या दरोडेखोरांनी अमानुष हत्या केली. विशेष म्हणजे दरोडेखोरांनी घरातून केवळ दोन हजार रूपये आणि मंगळसूत्र पळवून नेले. त्यामुळे दरोड्यामागे आणखी काही विशिष्ट हेतू असल्याचा संशय येत आहे. आंबेगाव तालुक्यातील गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना आहे. या संबधांत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

close