वाशिम येथील ज्ञान’दीप’ दाता

December 12, 2010 1:34 PM0 commentsViews: 8

मनोज जयस्वाल, वाशिम

12 डिसेंबर

वाशिम जिल्ह्यातील हिरामण हिंगोले हे जन्मत:च दोन्ही डोळ्यांनी अंध आणि अशिक्षित आहे. मात्र चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी निराधार योजनेतील पैसा जमवून शिक्षणसंस्था सुरु केली. हिरामण यांची धडपड आहे ती चिमुकल्यांच्या जीवनात ज्ञानदीप लावण्याची.

हिरामण हिंगोले आणि त्यांच्या अवतीभवती घोटाळणारी चिमुरडी मुलं. मंगळपीरच्या गावकर्‍यांना हे दृश्य नवीन नाही. हिरामण जन्मत:च अंध. पण या अपंगत्वावर मात करत त्यांनी मुलांसाठी संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालय ही शाळा उभारली.पण हा प्रवास सोपा नव्हता.

वाशिम जिल्हयातले हिरामन इंगोले. जन्मत:च अपंग हिरामणला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही. हिरामणचं सगळं आयुष्यच खडतर.मंगरुळपीर इथल्या एका हॉटेलमध्ये धुणीभांडी करुन त्यांनी दिवस काढले. हाती आलेला पैसा खर्च न करता पै पै वाचवले आणि सात लाख रुपये जमा केले. या पैशातून त्यांनी समाजातील गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा काढली. आज त्यांच्या संत गाडगे महाराज प्राथमिक विद्यालयात 250 विद्यार्थी शिकत आहेत.सहा शिक्षक या शिकवतात. पहिली ते सहावीपर्यंतची ही शाळा आहे. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं. त्यांच्या या प्रयत्नाविषयी त्यांच्या शाळेत शिकवणार्‍या शिक्षकवर्गालाही अभिमान आहे.

आपल्या खडतर आयुष्याच्या प्रवासातून पैसे साठवून प्रसंगी अपंगासाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ घेऊन हिराभाऊंनी ही शाळा सुरु ठेवली. आज या शाळेत पहिले ते सहावीपर्यंतचे वर्ग आहेत. पण जसे शाळेचे संस्थापक आगळे तसेच या शाळेची शिकवणही. आज अडीचशे मुलं या शाळेत शिकतात. पण या मुलांना केवळ शिक्षणाची तोंडओळख करुन हिरामण थांबलेले नाहीत. तर त्यांची स्वप्न त्याहूनही मोठी आहेत.

close