लातूर येथे जीप – कंटेनर अपघातात 6 ठार

December 12, 2010 2:22 PM0 commentsViews: 4

12 डिसेंबर

लातूर जिल्ह्यात उदगीरवरुन वाडवणा येथे जाणार्‍या एका जीपला कंटेनरने उडवलं. नांदेड -बिदर महामार्गावर दुपारी चारच्या सुमारास हा अपघात झाला असून ही जीप प्रवाशांची अवैध वाहतूक करणारी होती. या अपघातात जीपमधील 16 प्रवाशांपैकी 6 प्रवासी ठार झाले. तर 10 प्रवासी जखमी असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उदगीरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल आहे.

close