मुंबई-पुणे सायकल स्पर्धेत हरप्रीत सिंगनं मारली बाजी

December 12, 2010 2:41 PM0 commentsViews: 5

12 डिसेंबर

मुंबई पुणे सायकल रेसमध्ये हरप्रित सिंगनं बाजी मारली. हरप्रित सिंगने मुंबई ते पुणे हे अंतर 3 तास 43 मिनीट आणि 35 सेकंदात पार करत विजेतेपद पटकावलं आहे. तर परमजीतने दुसरा आणि गुरमीत सिंगने तिसरा क्रमांक पटकावला आहे. विजेत्याला रोख रक्कम 61 हजाराचं पारितोषीक देण्यात येणार आहे. खंडाळ्याचा अवघड घाट पार करणारा साबु गलीगर घाटाचा राजा ठरला. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या 70 व्या वाढदिवसा निमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गेटवे ऑफ इंडियापासून या शर्यतीला सुरुवात झाली. पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: सायकल चालवून या स्पर्धेला हिरवा कंदील दाखवला. या स्पर्धेत देशभरातून 191 स्पर्धक सहभागी झालेत. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना साडेसहा लाखांची बक्षिसं देण्यात येणार आहेत. बारामती मित्र मंडळ आणि महाराष्ट्र सायकल असोशिएशन यांच्यावतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

close