दिग्विजय सिंह यांची वादग्रस्त विधानावरून सारवासारव

December 12, 2010 2:47 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर

आपली भूमिका बदलण्यासाठी 24 तास हा राजकारणातला मोठा कालावधी असतो. आणि काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी 24 तासांच्या आतच आपल्या वादग्रस्त विधानावरून पलटी मारली. करकरेंच्या मृत्यूला पाकिस्तान जबाबदार नाही असं मी कधीच म्हटलं नव्हतं, तसंच त्यांच्या मृत्यूत हिंदुत्ववादी नेत्यांचा हात असल्याचं म्हटलं नाही, असे दिग्विजय यांनी सांगितले.

शहीद हेमंत करकरेंनी आपल्याला 26/11 हल्ल्याच्या दोन तास आधी फोन केला होता.आणि मालेगाव प्रकरणामुळे आपल्या जीवाला हिंदू संघटनांकडून धोका असल्याचं म्हटलं होतं असा दावा दिग्विजय यांनी केला होता. त्यावर चौफेर टीका झाली. शहीद करकरे यांच्या पत्नीकविता करकरे यांनी या राजकारणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेनेनंही दिग्विजय यांच्या वक्तव्यावर कडाडून हल्ला केला.

दिग्विजय यांना स्वतःच्या पक्षातूनच घरचा आहेर मिळाला. खासदार संजय निरुपम यांनी दिग्विजय यांच्या विधानाचा समाचार घेतला. त्यानंतर दिग्विजय यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. करकरेंच्या मृत्यूला पाकिस्तान जबाबदार नाही असं मी कधीच म्हटलं नव्हतं, तसंच त्यांच्या मृत्यूत हिंदुत्ववादी नेत्यांचा हात असल्याचं म्हटलं नाही, असे दिग्विजय यांनी सांगितले. दिग्विजय सिंग यांनी संजय निरूपम यांना फोन करून त्यांचाही गैरसमज दूर केल्याचं सांगितलं.

दिग्विजय सिंग यांनी निरुपम यांना फोन करून आपली भूमिका स्पष्ट केली. अल्पसंख्याकांच्या व्होट बँकवर लक्ष ठेवून दिग्विजय यांनी अनेकवेळा वादग्रस्त विधान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू दहशतवादावर सातत्याने हल्ला करण्याचे कारण हेच. यापूर्वीही त्यांनी मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतल्या बाटला हाऊस एन्काऊंटरमधल्या संशयित अतिरेक्यांच्या घरालाही त्यांनी भेट दिली. आणि आता त्यांनी 26/11 सारख्या अतिशय संवेदनशील मुद्याला हात घालून वाद निर्माण केला.

close