खान्देशातील शेतकर्‍यांचा अटकेपार झेंडा ; हॉवर्ड विद्यापीठाकडून दखल

December 12, 2010 3:02 PM0 commentsViews: 44

प्रशांत बाग, जळगांव

12 डिसेंबर

नैसर्गिक संकट आणि उत्पादनात सतत होणारी अनियमितता यानं कांदा उत्पादक शेतक-यांच्या डोळ्यांत नेहमीच पाणी आणले. पण याच कांद्याची शेती करताना चोपडा तालुक्यातील हेमचंद्र पाटील यांनी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग केले. जैन इरिगेशननं विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाचाही फायदा त्यांनी घेतला. त्यांच्या या कामाची दखल अमेरिकेच्या हॉवर्ड विद्यापीठानं घेतली.

भडगावच्या राजेंद्र पाटील यांनीही 2 एकर शेतीत टिश्यू कल्चरचा वापर करुन केळीचे भरघोस पीक घेतले. करपा रोगासारख्या अनेक रोगाचे आक्रमण होऊनये यासाठी त्यांनी केळीच्या पिकाचे एकेरी उत्पादन घेतले. उत्पादन घेताना त्यांनी आपल्या शेतात नेहमीचे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला.या दोन्ही शेतकर्‍यांना जैन ईरिगेशन या कंपनी साथ दिली. शेतकरी आत्महत्या होत असताना शेतीत नंदनवन कस फुलवता येईल याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे हे दोन शेतकरी. त्यांनी अमेरिकेत जाऊन यांची माहिती सांगितली.

close