उमा भारतींच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

December 12, 2010 4:40 PM0 commentsViews: 2

12 डिसेंबर

भाजपच्या बडतर्फ नेत्या उमा भारती पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याचं निश्चित मानलं जातं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर याबाबतचे संकेत दिले. 2005 मध्ये उमा भारती यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता उत्तर प्रदेशात पक्षाचे काम करण्यासाठी उमा भारती येत असल्याचे अडवाणी यांनी ब्लॉगमध्ये म्हंटले आहे. त्यामुळं भारती यांचा पक्षप्रवेश निश्चित मानला जातो. दरम्यान, उमा भारती यांनीही आपल्या पुनरागमनाबाबत प्रथमच जाहीरपणे माहिती दिली.

close