अशोक चव्हाणांनी नियम डावलून बिल्डरांना भूखंड दिले – रामदास कदम

December 13, 2010 9:08 AM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

ठाण्यातील एक भूखंड नियम डावलून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हिरानंदानी बिल्डरला दिल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार रामदास कदम यांनी केला आहे. कोणत्याही टेंडर शिवाय ही जमीन बिल्डरला देण्यात आली.2 दिवसात 35 सातबार्‍यावरील नावे बदलवण्यात आली. हा निर्णय कायद्यात येत नाही असं ठाण्याच्या आयुक्तांनी सांगितलं होतं. मात्र मुख्यमंत्री पदाच्या शेवटच्या दिवसात अशोक चव्हाणांनी हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. हा भूखंड ठाण्यातील घोडबंदर रोडवरील कोळशेत इथला आहे. हा 84 एकरचा भूखंड केवळ हिरानंदानींशी संबधीत रोमा बिल्डर्स या कंपनीला केवळ 127 कोटी रुपयाला देण्यात आला. बाजारभावाप्रमाणे या जमिनीची किमंत हजारो कोटी रुपये आहेत असा आरोप कदम यांनी केला.

close