‘तहकूब’ करत संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता

December 13, 2010 9:22 AM0 commentsViews: 6

13 डिसेंबर

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस होता पण सलग 22 व्या दिवशी जेपीसीच्या मागणीवरून गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं. संसद हल्ल्यामध्ये शहीद झालेल्यांना श्रद्धांजली वाहत कामकाजाला सुरूवात झाली होती पण त्यानंतर लगेचच विरोधक आक्रमक झाले आणि दोन्ही सभागृहांचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. पण हा गोंधळ कायम राहिल्याने कामकाज अखेर अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.

अधिवेशनात काय काय घडलं आणि प्रत्यक्षात किती काम झालं

23 दिवसांच्या अधिवेशनाच्या काळात सभासद फक्त 2 तास 44 मिनिटांसाठीच एकत्र आले.

या कालावधीमध्ये लोकांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी निगडीत एकाही गोष्टीवर चर्चा झाली नाही

कोणतेही विशेष मुद्दे या काळात मांडले गेले नाहीत

शून्य प्रहरात एकाही मुद्दयावर चर्चा झाली नाही

एकही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही

4 विनियोजन विधेयकं गदारोळात मंजूर करण्यात आली

close