अधिकार्‍यांनी सबबी नव्हेत तर काम दाखवावे – मुख्यमंत्री

December 13, 2010 9:28 AM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

लंगडी कारणं आणि सबबी सांगणं अधिकार्‍यांनी सोडून द्यावं आता काम दाखवावं लागेल सबबी नव्हे अशी तंबीच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकार्‍यांना दिली. चव्हाण यांनी आज गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. जिल्ह्यातल्या विकासकामांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी गृहमंत्री आर. आर. पाटील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी पोलिस अधिकार्‍यांचीही बैठक घेऊन नक्षलविरोधी अभियानाचा आढावा घेतला. मागास गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी रिक्त पदांवर चर्चा केली. तसेच या भागाच्या विकासासाठी केंद्र सरकारशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्याच्या हक्काच्या पाण्याचा एक थेंबही कुणालाही देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दारूबंदीवर काय उपाययोजना करता येईल याबाबतचा त्यांनी आढावा घेतला.

close