बुलढाण्यात शिवसैनिकांचा रास्ता रोको आंदोलन

December 13, 2010 9:47 AM0 commentsViews: 5

13 डिसेंबर

बुलढाणा जिल्ह्यात मेहकरजवळ नागपूर- औरंगाबाद हायवेवर शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केला. ओेला दुष्काळ जाहीर करा, शिवसेनेच्या आमदाराचं निलंबन रद्द करा आणि नांदूरा तालुक्यातील जिगाव भ्रष्टाचाराची सीबीआय चौकशी करा या मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. पहाटे 5 पासून शिवसैनिकांनी महामार्ग अडवून धरला. या मार्गावरच्या अनेक वाहनांचे टायर आंदोलकांनी पंक्चर केल्याने वाहतूक ठप्प झाली. तर बुलडाणा शहरातही शिवसैनिकांनी बसची तोडफोड केली. दरम्यान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानदेव मानकर यांच्यासह 200 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

close