शर्ट काढून विधानसभेत बसल्यामुळे कडू यांना सभागृहाबाहेर काढले

December 13, 2010 10:20 AM0 commentsViews: 8

13 डिसेंबर

अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना विधानसभेतून बाहेर काढण्यात आलं आहे. शर्ट काढून विधानसभेत बसल्यामुुळे विधानसभा अध्यक्षांनी कडू यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगीतलं. केवळ प्रसिध्दीसाठी असल्या प्रकारचे स्टंंट होणार असतील तर हे चुकीचं आहे, ते खपवून घेणार नाही या शब्दात विधानसभा अध्यक्षांनी त्यांना सुनावलं. अमरावती जिल्हातील सोफीया विद्युत प्रकल्प जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत शर्ट काढूनच विधानसभेत बसणार असा निर्धार बच्चू कडू यांनी केला होता. मात्र खादीचे कपडे घालून विधानसभेत बसण्यात काय चूकीची आहे असा सवाल बच्चू कडू यांनी केला.

close