पुनर्वसन केल्यावरचं जमीन देणार ; नवी मुंबई शेतकर्‍यांचा निर्णय

December 13, 2010 10:46 AM0 commentsViews: 1

13 डिसेंबर

सिडकोनं योग्य पुनर्वसन केल्यानंतरच नवी मुंबई एअरपोर्टसाठी जमीन देऊ असा निर्धार नवी मुंबईच्या 18 गावातल्या शेतकर्‍यांनी केला.आधी पुनर्वसन आणि नंतरच जमीन देण्याचा निर्णय या शेतकर्‍यांनी घेतला. काल 18 गाव संघर्ष समितीची पहिल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकार किंवा सिडकोने जाहीर केलेल्या पॅकेज ऐवजी स्थानिकांच्या मागणीचे पॅकेज निश्चित झालं पाहिजे. एअरपोर्टच्या कामाला सुरूवात होण्यापूर्वी आमचा विकास झाला पाहिजे, अशा शेतकर्‍यांच्या मागण्या आहेत. प्रथम शेतकर्‍यांसाठी टाऊनशीप उभारा आणि नंतरच जमिनी ताब्यात घ्या,असा इशारा आमदार विवेक पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला.

close