फेरीवाल्याचे पुनर्वसन तत्काळ करावे शिवसेनेची मागणी

December 13, 2010 11:22 AM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

कोल्हापूर शहरातील फेरीवाल्याचे पुनर्वसन तत्काळ करावे या मागणीसाठी फेरीवाल्यांनी आज कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. हा मोर्चा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला.गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर महानगरपालिकेनं अतिक्रमण निर्मुलनची कारवाई जोरदार सुरु केली. पण ह्या फेरीवाल्याच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने कोणत्याच उपाययोजना केलेल्या नाहीत.असा आरोप फेरीवाल्यांनी केला. त्यामुळे ह्या फेरीवाल्यांनी आज शिवसेनेच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर महानगरपालिकेवर मोर्चा काढला. त्याचबरोबर तात्काळ फेरीवाल्याचे पुनर्वसन करा असा म्हणून फेरीवाल्यांनी ठिय्या आंदोलन केले आणि आयुक्त विजय सिंघल यांना धारेवर धरले.

close