सवाई गंधर्व महोत्सवाची सुरमई सांगता

December 13, 2010 12:23 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर

सवाई गंधर्व महोत्सवाची काल उत्साहात सांगता झाली. या कार्यक्रमात वत्सलाबाई जोशी सन्मान माधव गुडी यांना प्रदान करण्यात आला. यानंतर पंडित उपेंद्र भट यांच्या गायनानी रंगत आणली. गुरु माधव गुडी यांच्या समोर गायला मिळाल्यामुळे आनंद झाल्याची भावना यावेळी भट यांनी व्यक्त केली.

कलेच्या वेगवेगळ्या प्रकारांचा आविष्कार सवाई गंधर्व महोत्सवात पहायला मिळतो. काल सवाई मध्ये कथ्थकची अदाकारी रंगली. पंडित बिरजू महाराजांची मुलं आणि शिष्य पंडित दिपक महाराज आणि ममता महाराज यांनी कथ्थक नृत्य सादर केलं. पढंत, जुगलबंदी, धमार मधल्या रचना आणि चौगलबंदीनं संपुर्ण महोत्सवात रंगत आणली. रसिकांनीही भरभरुन दाद दिली.

close