सचिन झळकणार टाईम्स मॅगझिनमध्ये

December 13, 2010 12:50 PM0 commentsViews: 4

13 डिसेंबर

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने यावर्षीच्या टाईम्स मॅगझिनमध्ये स्थान मिळवलं आहे. स्पोर्ट्समधल्या या वर्षातल्या सर्वोत्तम दहा कामगिरींमध्ये सचिनच्या वन डे डबल सेंच्युरीचा समावेश करण्यात आला आहे. वन डे मध्ये सर्वात जास्त रन्स सचिनच्याच नावावर आहेत. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्द त्याने केलेली डबल सेंच्युरी वन डेच्या इतिहासातली पहिली डबल सेंच्युरी ठरली. त्यामुळे टाईम्स मॅगझिननेही या इनिंगची खास दखल घेतली. दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या टीमविरुद्ध सचिनने ही डबल सेंच्युरी केली होती.

close