ए राजांची चौकशी होणार नाही !

December 13, 2010 1:26 PM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

2 जी स्पेक्ट्रम घोटाळयाप्रकरणी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांची एकसदस्यीय समिती चौकशीला सुरुवात करणार आहे. पण ए. राजा यांच्यासह कोणत्याच माजी दूरसंचार मंत्र्यांची चौकशी केली जाणार नाही असं पाटील यांनी स्पष्ट केले. फक्त स्पेक्ट्रम वाटपाची प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली की नाही, याचा तपास केला जाणार आहे. चौकशीत दूरसंचार विभागाच्या अंतर्गत कामकाजावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. सीबीआयसह इतर संस्थाकडून सुरू असलेल्या मुद्द्यांना चौकशी समिती स्पर्श करणार नसल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान दूरसंचार मंत्रालयाने कंपन्यांना कारणे दाखवा नोटीसी पाठवायला सुरूवात केली आहे. दूरसंचार सचिव आर. चंद्रशेखर यांनी ही माहिती दिली. आठवड्याभरात सर्वांना नोटीसी देण्याचे काम पूर्ण होणार आहे. सुरूवातीला 5 कंपन्यांचे 85 परवाने रद्द करण्याबाबतच्या नोटीशी पाठवल्या जाणार आहेत.

close