राज्यभरात थंडीचा कडाका वाढला

December 13, 2010 1:52 PM0 commentsViews: 4

13 डिसेंबर

अवकाळी पावसामुळे हिवाळ्याची सुरुवात उशीरा झाली असली तरी राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. पुण्यात तापमान कमी झालं झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिली आहे. अनेक ठिकाणी शेकोट्या दिसायला लागल्यात. पुण्यामध्ये काल 15 डिग्री सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली . नागपूरमध्ये 18 डिग्री किमान तापमान नोंदवलं गेले. तर नाशिकमध्ये सर्वात कमी म्हणजे 7 सेल्सियस अंश तापमानाची नोंद झाली. थंडीचा कडाका वाढल्याने गरम कपड्यांच्या विक्रीत वाढ झाली.

किमान तापमान

मुंबई 21.6 पुणे – 15.7 नाशिक – 7.0, औरंगाबाद – 14.1, कोल्हापूर – 14.4, नागपूर – 14.0

close