माझ्या विधानावर मी ठाम आहे- दिग्विजय सिंह

December 13, 2010 2:03 PM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

हेमंत करकरे यांच्याबाबतच्या माझ्या विधानावर मी ठाम आहे असं काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी म्हटलं आहे. करकरे यांच्यासोबतच्या आपल्या संभाषणाचा संपूर्ण रेकॉर्ड मिळाला आहे असा दावाही त्यांनी केला आहे. 26/11 हल्ल्याच्या काही तासांपूर्वी करकरे यांच्यासोबत आपलं बोलणं झाल्याचं विधान दिग्विजय सिंग यांनी केले होते. आपल्या जिवाला धोका असल्याचे करकरे यांनी मला सांगितले होते असा दावा दिग्विजय सिंग यांनी केला होता. त्यावर नंतर वादही झाला.आणि काँग्रेसला सारवासारवही करावी लागली होती. कविता करकरे यांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

close