कतरिना कैफ जगातली सर्वांत मादक स्त्री

December 13, 2010 4:20 PM0 commentsViews: 163

13 डिसेंबर

बॉलीवुडची शीला अर्थात कतरिना कैफला जगातली सर्वांत मादक स्त्री होण्याचा मान मिळाला आहे. लंडनच्या इस्टर्न आय या वृत्तपत्राने हॉटेस्ट विमेन इन द वर्ल्डची यादी तयार केली आहे,त्या यादीत कतरिनाने पहिला नंबर पटकावला आहे. सलग तिसर्‍या वर्षी कतरिनाला हा मान मिळाला. या स्पर्धेत तीने प्रियांका चोप्रा आणि बिपाशा बासुला मागे टाकण्यात यश मिळवलं आहे. या दोघींनाही अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला. तर फ्रेडा पिंटो या यादीत चवथ्या नंबर आहे. या बॉलीवुड ब्युटीज्‌च्या स्पर्धेत करिना कपूरला मात्र सातव्या क्रमांकावर समाधान मानवं लागलं. थोडक्यात काय तर शीलाचा फॉर्म्युला चांगलाच हिट ठरला.

close