बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मुंबई बाहेर हलवलं जाणार नाही – भास्कर जाधव

December 13, 2010 4:39 PM0 commentsViews: 5

13 डिसेंबर

बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मुंबईबाहेर हलवलं जाणार नाही अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आज विधानपरिषदेत दिली. मुंबई पोर्ट ट्रस्टला मुंबई बाहेर हालवण्याचा घाट घातला जातोय का अशा आशयाची एक लक्षवेधी आज चर्चेला आली होती. त्यावर सरकारच्या वतीने भास्कर जाधव यांनी हे उत्तर दिलं. मात्र राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी स्वत:च अशा आशयाचा प्रस्ताव केंद्रीय बंदरे विकास मंत्रालयाकडे पाठवला होता. बीपीटीद्वारे आता फार मोठा व्यापार चालत नाही त्यामुळे हे बंदर मुंबईबाहेर हलवावे असं या प्रस्तावात राज्य सरकारने म्हटलं होते. पण याबद्दल भास्कर जाधव यांनी उत्तर दिलं नसल्याने सरकारच्या मनात नेमकं काय आहे ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.

close