राहुल गांधी गूगलवर सर्वांत लोकप्रिय राजकारणी

December 13, 2010 5:09 PM0 commentsViews: 3

13 डिसेंबर

बिहारच्या निवडणुकीत काँग्रेसचा फ्लॉप शो झाला असला तरी काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यावर्षीचे सर्वाधिक लोकप्रिय राजकारणी ठरले आहे. राहुल गांधींबद्दल जाणून घेण्यात गुगलप्रेमींनी पसंती दाखवली आहे. गुगलवर सर्वाधिक सर्च झालेले राहुल गांधी हे यावर्षीचे आघाडीचे राजकारणी ठरले आहेत. तर बॉलीवूडमध्ये या सर्चइंजिनवर भारतातून कतरिना कैफ त्यानंतर सलमान खान यांना सर्वाधिक हिटस् मिळाल्यात. तर प्रिन्स या सिनेमात भूमिका साकारलेली ब्रिटीश अभिनेत्री अरुणा शिल्ड्स्‌सची लोकप्रियताही वाढतं आहे.

close