पोलीस आयुक्तांची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

December 13, 2010 4:34 PM0 commentsViews: 2

13 डिसेंबर

मुंबईत दहिसर येथे सहाय्याक पोलीस आयुक्त बी.डी.गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्येच आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गायकवाड यांनी सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली . गायकवाड हे दहिसर विभागाचे विभागीय सहाय्याक पोलीस आयुक्त होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र अजून समजू शकलेले नाही. कमिशनर ऑफिसमधून दुपारी एक मिटींग आटोपून ते दहिसरच्या ऑफिसमध्ये आले. त्यानंतर तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या कॅबिनचे दार लावून घेऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली.

close