राडिया टेप प्रकरणी सुप्रीम कोर्टाने मीडियाला फटकारलं

December 13, 2010 5:36 PM0 commentsViews: 5

13 डिसेंबर

नीरा राडिया टेप प्रकरणात सुप्रीम कोर्टाने मीडियाला फटकारलं आहेत. पुराव्याशिवाय एखाद्याच्या प्रतिमेला गालबोट लावणं, बंद करा असं कोर्टाने बजावलं आहे. नीरा राडिया टॅपिंग प्रकरणी रतन टाटा यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना कोर्टाने या सूचना दिल्या आहेत. राडिया यांच्या टेप्स मीडियापुढे उघड करायला नको होत्या त्याऐवजी त्यांचा वापर तपासासाठी करायला हवा होता असं टाटा यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. या प्रकरणामुळे आपल्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ झाल्याचा दावा टाटा यांनी केला होता.

close