4 नोव्हेंबरला गुरु-ता-गद्दी सोहळ्याची सांगता

November 1, 2008 9:24 AM0 commentsViews: 3

01नोव्हेंबर- नांदेड,नांदेडला सुरू असलेल्या गुरु-ता-गद्दी सोहळ्याचा समोरोप आता जवळ येऊ लागला आहे. सोहळयासाठी देश विदेशातून तीन लाखांच्या आसपास शिख भाविक नांदेडमध्ये दाखल झाले. 4 नोव्हेंबरला या सोहळ्याची सांगता होत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारा गुरु-ता-गद्दी सोहळा हा नांदेडकरांसाठी कायमस्वरूची आठवण म्हणून राहिला. गेल्या दोन वर्षांपासून देश विदेशातलेशीख बांधव या सोहळ्याची वाट बघत होते. तर येणा-या भाविकांचं आदरातिथ्य करण्यासाठी नांदेडकरही तेवढेच उत्सुक होते. या सोहळ्यात भाविकांच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातले काही डॉक्टर्स मोफत सेवा देत आहेत. एकीकडे प्रांतवाद आणि भाषावादावरून देशभर वातावरण तापलंय. तर दुसरीकडे गुरू-ता-गद्दी सोहळा यशस्वी करून नांदेडकरांनी धर्माच्या आणि प्रांतांच्या मर्यादा माणसांना अडवू शकत नाहीत हे सिध्द केलंय.

close