फोन टॅपींग प्रकरणाचं पंतप्रधानानी केलं समर्थन

December 14, 2010 10:29 AM0 commentsViews: 6

14 डिसेंबर

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी फोन टॅपींग प्रकरणाचे समर्थन केले आहे. या प्रकरणी काही कॉर्पोरेट कंपन्यांची नाराजी मी समजू शकतो. पण देशाच्या हितासाठी टॅपींग करण्यात आलं होतं असं पंतप्रधान म्हणाले. देशाची सुरक्षा, टॅक्स चुकवणारे, आणि पैसा देशाबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी फोन टॅपींग करण्यात आलं. पण फोन टॅपींग करतांना काळजी घेण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. संभाषणाचा गैरवापर होऊ नये. तसेच तपास यंत्रणांशिवाय फोन संभाषणाचा तपशील दुसर्‍याला उपलब्ध होऊ नये यासाठी सक्षम यंत्रणा तयार करण्याची गरज आहे.या संदर्भात कॅबिनेट सचिवांनी अहवाल दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले आहे.

close