रस्त्यात सापडलेले 2 लाख रुपये परत केले

December 14, 2010 11:41 AM0 commentsViews: 2

14 डिसेंबर

सध्याच्या जमान्यातही प्रामाणिक टिकून असल्याचे उदाहरण नुकतच डोंबिवली इथे घडलं. दिपक प्रजापती या तरुणाने रस्त्यात सापडलेले 2 लाख रुपये संबंधित मालकाला परत केले. सुरेश गायकवाड यांनी मुलाच्या लग्नासाठी 2 लाख रुपये जमवले होते. पैसे आणि पत्रिका असलेली त्यांची पिशवी हरवली. या रस्त्यावरुन बाईकने जाणार्‍या दीपकला ही पिशवी सापडली. मात्र त्याने पत्रिकेवरचा पत्ता आणि फोन नंबर वाचून त्याने गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. तसेच त्यांचे पैसे परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल दीपकचा सत्कार करण्यात आला.

close