डेव्हीड अश्विलीने जनसुराज्य शक्ती केसरीचा किताब पटकावला

December 14, 2010 7:32 AM0 commentsViews: 45

14 डिसेंबर

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर इथं आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत जॉर्जीयाच्या डेव्हीड मोजमानो अश्विलीने जनसुराज्य शक्ती केसरीचा किताब पटकावला. त्यानं भारताच्या अर्जुन पुरस्कार विजेता राजीव तोमरचा पराभव केला. ही फायनल अटातटीची झाली. पण डेव्हिड अश्विलीने मोक्याच्या क्षणी सरस खेळ करत बाजी मारली. पहिल्या दोन राऊंडमध्ये त्याने एक – एक पॉइंट मिळवला. पण भारताच्या तोमरला एकाही पॉइंटची कमाई करता आली नाही. दुसर्‍या राऊंडनंतर डेव्हिडला विजेता घोषित करण्यात आलं. सलग दुसर्‍यांदा त्याने जनसुराज्य शक्ती केसरीवर आपलं नाव कोरलं आहे. वारणा साखर केसरीसाठी हिंद केसरी रोहित पटेल आणि जागतीक विजेता लिवन स्टुरिझे यांच्यात लढत झाली. यात लिवनने रोहीत पटेलचा पराभव केला.भारत आणि हिंद केसरी रोहित पटेल याला महाराष्ट्रात पहिल्यांदाच हार पत्करावी लागली हे ह्या स्पर्धेचं वैशिष्ट ठरलं.

close