राजस्थान रॉयल्सला हायकोर्टाचा दिलासा

December 14, 2010 12:04 PM0 commentsViews:

14 डिसेंबर

बीसीसीआयनं बंदी घातलेल्या राजस्थान रॉयल्सला हायकोर्टाने दिलासा दिला आहे. हायकोर्टाने राजस्थान रॉयल्सवरील बंदीला सशर्त स्थगिती दिली. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आता खेळाडूंच्या लिलावात सामील होऊ शकणार आहे. पण त्यासाठी त्यांनी बीसीसीआयकडे 2.83 मिलियन डॉलर्स जमा करण्याचे आदेश कोर्टाने दिले.

close