जळगावात थंडीचा पहिला बळी

December 14, 2010 12:32 PM0 commentsViews: 1

14 डिसेंबर

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर सुरुच आहे. तर जळगावात थंडीचा पहिला बळी गेला आहे. जिल्ह्यातील पाचोरा इथं एका वृद्धाचं थंडीनं गारठून मृत्यू झाला आहे. कडक उन्हाळा असलेलं शहर म्हणून ओळख असलेल्या जळगांवात यंदा थंडींही विक्रमी हजेरी लावली आहे. गेल्या 4 दिवसापासून तापमानात जवळपास 3 डिग्रीची घसरण झाली आहे.जळगावमध्ये तापमान 8.9 अंश सेल्सिअसवर गेलं आहे.

close