लवासाच्या दारी गेलं होतं सरकार – फडणवीस

December 14, 2010 6:22 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

एकीकडे लवासासमोरील अडचणी वाढतायत तर तिकडे नागपूरमध्येही अधिवेशनात विरोधक लवासावरुन आक्रमक झाले आहे. लवासाला परवानगी देण्यासाठी 2007 मध्ये सरकारच लवासाच्या दारी गेलं होतं असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. लवासाला वेगवेगळ्या परवानग्या देण्यासाठीची एक खास बैठक 2007 मध्ये लवासामध्येच घेण्यात आली. आणि या बैठकीला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, शरद पवार, अजित पवार बैठकीला उपस्थित होते असा आरोप भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला.

या बैठकीत अनेक प्रकारच्या परवानग्या देण्यासंदर्भात कारवाई करू असा निर्णय घेतला गेला आणि त्यानंतर या निर्णयांचे जीआर निघत गेले असा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच या बैठकीला हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे सीएमडी अजित गुलाबचंद आणि नगरविकास विभागाचे अधिकारीही उपस्थित होते असा दावाही फडणवीस यांनी केला.

आजी आणि माजी महसूल मंत्र्यांचं समर्थन

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शरद पवारांचे समर्थन केले आहे. शरद पवारांनी लवासाला उघडपणे भेट दिली, लपूनछपून नाही असं थोरात यांनी म्हटलं आहे. लवासात काही अनियमितता झाली त्याची चौकशी होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. तर पवारांमुळेच महाराष्ट्रात मोठी गंतवणूक येऊ शकली असं राणे यांनी म्हटलं आहे.

close