पेट्रोल तीन रुपयांनी महागले

December 14, 2010 5:48 PM0 commentsViews:

14 डिसेंबर

आता आपल्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. पेट्रोलच्या किंमती लिटरमागे 2 रुपये 96 पैशांनी वाढणार आहेत. आज मध्यरात्रीपासनूच ही दरवाढ लागू होणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंडियन ऑयल, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या कंपन्यांनी हा दरवाढीचा निर्णय घेतला आहे. भारत पेट्रोलियमची पेट्रोल दरवाढ आज मध्यरात्रापासून लागू होणार आहे. तर इतर कंपन्यांची दरवाढ उद्यापासून लागू होणार आहे. मुंबईचा विचार केला तर सध्या पेट्रोलचे दर आहेत 57 रुपये 35 पैसे, आणि दरवाढीनंतर पेट्रोलचा दर 60 रुपये 31 पैसे असेल.

close