‘टुनपूर का सुपर हिरो’ प्रदर्शित होण्यास सज्ज

December 14, 2010 2:46 PM0 commentsViews: 3

14 डिसेंबर

लाइव ऍक्शन ऍनिमेटेड सिनेमा टुनपूर का सुपर हिरो आता लवकरचं रिलीज होत आहे. सिनेमाचा मुख्य अभिनेता अजय देवगण सिनेमाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या एका शाळेत गेला होता.

अजय देवगणसह तीन ऍनिमेटेड कॅरेक्टर्स एकत्र होते. लवीना,बानू,आणि गोपू मुंबईतल्या एका शाळेत सिनेमाच्या प्रमोशनसाठी आले होते. यावेळेस अजय देवगणने नुसतं फ्लॅग ऑफचं नाही केलं तर दरवर्षी मुंबई ट्रॅफिक पोलिस आणि पोद्दार जम्बो किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने होणार्‍या वाहतुक सुरक्षेच्या कँपेनमध्ये सहभागी झाला. तसेच वाहतुक सुरक्षेवर गेम लाँच केला. अजयच्या म्हणण्यानुसार त्याचा हा आगामी सिनेमा लहानमुलांबरोबर मोठेही तितकाच एन्जॉय करतील. या सिनेमाचं बजेट 28 करोड असून या लाइव ऍक्शन ऍनिमेटेड सिनेमासाठी तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत वाट पहावी लागेल.

close