लंच टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 आऊट 436 रन्स केल्या

November 1, 2008 7:06 AM0 commentsViews: 9

01 नोव्हेंबर-दिल्ली,फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्यातिस-या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या बॅट्सननी संयमी सुरुवात केली. लंच टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियाने 6 आऊट 436 रन्स केल्या. कालच्या 4 आऊट 338 रन्सवरुन ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्क आणि शेन वॉट्सननं इनिंग पुढे सुरू केली. अमित मिश्राच्या बॉलिंगवर मायकल क्लार्कची सोपी कॅच इशांत शर्माने सोडली. आणि बघता बघता ऑस्ट्रेलियाने रन्सचा 400चा टप्पा ओलांडला. अशा वेळी पुन्हा एकदा विरेंद्र सेहवागच्या बॉलिंगची जादू चालली. त्याने शेन वॉट्सनची विकेट काढत भारताला ब्रेक मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाची पाचवी विकेट पडली. दरम्यान, मायकल क्लार्कने टेस्टमधली आपली 8वी सेंच्युरी ठोकली. भारताची सकाळी आलेली चांगली बातमी म्हणजे कॅप्टन अनिल कुंबळे मैदानात परतला. काल हेडनची कॅच पकडताना कुंबळेच्या हाताला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं.

close