पुण्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या कॉलनीची दुरवस्था

December 14, 2010 4:43 PM0 commentsViews: 3

प्राची कुलकर्णी, पुणे

14 डिसेंबर

पुण्यातल्या आरोग्य कर्मचार्‍यांच्या कॉलनीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दर महिन्याला त्यांच्याकडुन घरभाडे घेणारी महानगरपालिका मात्र इथे साधी डागडुजी करायलाही तयार नाही. जीव मुठीत घेउन या घरांमध्ये राहणार्‍या या लोकांचे गार्‍हाणं त्यांनी आयबीएन लोकमत कडे मांडलं.

वारंवार कोसळणारी आणि गळणारी छतं, तुंबलेले ड्रैेनेज आणि भिंतींमध्ये उगवलेली झाडं ही आहे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांची जनवाडी परिसरातली कॉलनी. महानगरपालिकेच्या तब्बल 265 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय सध्या इथे अक्षरशः जीव मुठीत घेउन राहतात. महापालिकेनी 1967 साली बांधलेल्या कॉलनीची अवघ्या 40 वर्षांतच ही परिस्थिती झाली आहे. भाड्यापोटी कर्मचार्‍यांचे 3 हजार रुपये मात्र महापालिका न चुकता घेती.

महानगरपालिके तर्फे मात्र याविषयी कोणीही बोलायला तयार नाही. या वॉर्डचे नगरसेवक आणि सभागृह नेते निलेश निकम सध्या कामानिमित्त परदेश दौर्‍यावर गेले आहेत . तर महापौरही नॉट रिचेबल झाले आहेत. या लोकांचं गार्‍हाणं आता तरी महानगरपालिका ऐकणार का असाच प्रश्न हे कर्मचारी विचारतात.

close