अयोध्याप्रकरणी सुन्नी वक्फ बोर्डाची सुप्रीम कोर्टात धाव

December 14, 2010 5:16 PM0 commentsViews: 1

14 डिसेंबर

अयोध्येतल्या वादग्रस्त जमिनीच्या मुद्द्यावर सुन्नी वक्फ बोर्डाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाच्या निर्णयाविरोधात सुन्नी वक्फ बोर्डाने याचिका दाखल केली. अयोध्येतल्या वादग्रस्त जागेचे तीन भाग करण्याचा निर्णय लखनौ खंडपीठाने दिला होता. एक भाग सुन्नी वक्फ बोर्ड, दुसरा भाग राम लल्ला आणि तिसरा भाग निर्मोही आखाडा अशी ही विभागणी आहे. पण कोर्टाचा हा निर्णय श्रद्धेवर अवलंबून आहे, त्याला कायदेशीर पुराव्यांचा आधार नाही असं वक्फ बोर्डाने आपल्या याचिकेत म्हटलं आहे. याबाबत आणखी नऊ याचिका दाखल करणार असल्याचे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने सांगितलं.

close